Mr. Devdutt Joshi
नमस्कार,
मी देवदत्त जोशी, सोलापूर.
' मेडिसिटी हॉस्पिटल अँड डायबेटिक केअर सेंटर, सोलापूरचे संचालक डॉ. श्री. श्रीकांत पागे हे माझ्या कुटुंब-परिवारासाठी अत्यंत विश्वासू, प्रेमळ, भारदस्त व्यक्तिमत्व असलेले, उत्तम सल्लागार डॉक्टर.
वेळोवेळी डॉक्टरांकडून मिळालेला बहुमूल्य योग्य असा सल्ला व मार्गदर्शन माझ्या कुटुंबातील सर्वांचेच आरोग्य अधिक उत्तम आणि तंदुरुस्त राहण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.
हॉस्पिटलमधील सुविधा, स्वच्छता, शिस्त, आदरातिथ्य, माणुसकीने वागणारा, चांगली सेवा देणारा कर्मचारी वर्ग आणि योग्य सल्ला व मार्गदर्शन देणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळे ' मेडिसिटी हॉस्पिटल अँड डायबेटिक केअर सेंटर, सोलापूरचे अत्यंत अल्प कालावधीत नावलौकिक झाले.
भविष्यात देखील या हॉस्पिटलकडून व आपल्याकडून सर्वोत्तम सेवा आणि मार्गदर्शन गरजू रुग्णांना लाभावे अशी अल्पशी आशा व्यक्त करतो. तुमच्या या समाज उपयुक्त सेवा कार्यासाठी सर्वांचेच मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.